वेगवान रस्ते बांधणीच्या कामात भारताने (India) विक्रम रचला आहे. 2.5 किमी चा चौपदरी रस्ता आणि 25 किमीचा एकपदरी सोलापूर-बिजापूर रस्त्याचे (Solapur-Bijapur Road) बांधकाम अवघ्या 24 तासांत पूर्ण करत भारताने तीन विश्वविक्रम (Three World Records) केले आहेत, असे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Road Transport and Highways Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी सांगितले. (सोलापूर ते विजापूर 25 किमी रस्त्याचे 18 तासांमध्ये डांबरीकरण, 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये नोंद; नितीन गडकरी यांची ट्विटद्वारे माहिती)
या महिन्यात आपण तीन विक्रम केले आहेत. भारताने वेगवान रस्ते बांधणीच्या कामात विश्वविक्रम केला आहे. यामुळे 2.5 किमी चा चौपदरी रस्ता आणि 25 किमीचा एकपदरी रस्ता सोलापूर-बिजापूर रस्त्याचे बांधकाम अवघ्या 24 तासांत पूर्ण केले असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे, असे नितीन गडकरी यांनी लखनऊ मधील तेढी पुलिया उड्डाणपुलाचे उद्घाटन व खुरम नगर उड्डाणपुलाची पायाभरणी कार्यक्रमात सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 21 व्या शतकातील राजकारण प्रगतीपथावर आहे आणि येत्या पाच वर्षांत सरकार 111 लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधा निर्माण करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आत्मनिभार भारत' करण्याचा संकल्प केला आहे. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची बनवून स्वावलंबी होण्याचे ध्येय त्यांनी आम्हाला दिले आहे. (एक वर्षात सर्व रस्ते होणार टोल नाका मुक्त, हायवेवर लागणार GPS ट्रॅकर; नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती)
यापूर्वी गुरुवारी रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एका निवेदनात म्हटले होते की, राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम वर्ष 2020-21 मध्ये दररोज 37 किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे. मागील 4 वर्षांत राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. एप्रिल 2014 मध्ये 91,287 किमी इतकी होती. ती मार्च 2021 मध्ये 1,37,625 किमी इतकी झाली आहे, असेही गडकरींनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या आणि स्टेकहोलडर्सच्या अथक प्रयत्नांमुळे आपण हा उच्चांक गाठला आहे. हे ध्येय इतर कोणत्याही देशाने अद्याप गाठलेले नाही, असेही गडकरी म्हणाले.