येत्या 48 तासांत मान्सूनचे 'केरळ'मध्ये आगमन; हवामान खात्याचा अंदाज
Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

उन्हाने त्रासलेल्या सर्वांनाच मान्सूनची प्रतिक्षा आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आपल्या सर्वांसाठीच एक दिलासादायक बातमी आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार येत्या 48 तासांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. तर हवामान खात्याने देखील 7 जून रोजी मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे.

18 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला. त्यानंतर नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावला असला तरी लवकरच मान्सूनचे केरळात आगमन होईल. त्यानंतर 8 दिवसात मान्सून महाराष्ट्रात बरसेल, असा अंदाज आहे.

4 जून रोजी मान्सून श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर पुढच्या 6 दिवसात तो भारतात प्रवेश करतो. त्यामुळे साधारण 9-10 जून रोजी मान्सून भारतात दाखल होईल असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. (मुंबईसह अन्य ठिकाणी पुढील 24 तासात मान्सून पूर्व पावसाची शक्यता, 'स्कायमेट' चा अंदाज)

मान्सूनच्या केरळातील आगमनासोबतच मुंबईसह आसपासच्या भागातही पुढील 48 तासांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा स्कायमेटचा अंदाज आहे.