मुंबईसह (Mumbai) अन्य ठिकाणी पुढील 24 तासात मान्सून पूर्व (Pre-Monsoon) पावसाची शक्यात 'स्कायमेट' या खासगी हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तत्पूर्वी श्रीलंका येथे मान्सून दाखल झाला असून भारतातही लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. तर भारतामध्ये 9-10 जून रोजी मान्सून भारतात होईल असे सांगण्यात येत आहे.
या वर्षी श्रीलंका येथे मान्सून 25 मे रोजी दाखल होतो. मात्र कालपासून मान्सून श्रीलंकेत दाखल झाल्याने तमिळनाडू येथे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तमिळनाडूच्या मन्नर येथील गल्फ भागात पावसाचे चिन्ह निर्माण झाले असून समुद्राच्या लाटा अधिक वरती येताना दिसून येत आहेत.
#WATCH: Rough sea conditions in Gulf of Mannar ahead of Monsoon arrival. #TamilNadu pic.twitter.com/VBKzQFulxS
— ANI (@ANI) June 4, 2019
तर येत्या 24 तासात मुंबईसह अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोळणार आहेत. त्याचसोबत ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडतील असे सुद्धा स्कायमेट यांनी सांगितले आहे. मात्र त्यानंतर मुंबईत पुन्हा वातावरण कोरडे राहिल असा अंदाज वर्तवला जात आहे.