
सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करताना दिसून येणार आहे. सेंट लुसियातील डॅरिन सॅमी मैदानावर होणारा हा सामना सेमिफायनलच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात जिंकून भारतीय संघाला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही संघ 2007 पासून आमनेसामने येत आहत. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. (हेही वाचा - IND vs AUS ICC T20 WC 2024 Live Telecast On DD Sports & Other Platforms: ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थानासाठी टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार, जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे थेट प्रसारण पाहता येणार)
आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ 5 वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड आहे. यासह न्यूट्रल वेन्यूवर खेळताना दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे.
भारताचे संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग 11: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.