Hyderabad Rains: हैद्राबादमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; 11 जणांचा मृत्यू, शहरात पूरस्थिती, पहा काळजाचा ठोका चुकवणारे Photos and Videos
Hyderabad Floods in Pics (Photo Credits: @Rithvik_yadav/ Twitter)

पुढील तीन ते चार दिवस भारतामधील काही राज्यांत मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्य वर्तवण्यात आली आहे. तेलंगानाची राजधानी हैदराबाद (Hyderabad) येथे मुसळधार पावसाने पूरस्थिती (Flood) निर्माण झाली. हैदराबाद व आसपासच्या भागात सतत पडणाऱ्या पावसाने जवळजवळ संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. रस्त्यावर गुडघ्यांपेक्षा जास्त साचले पाणी आहे आणि त्याचा वेग इतका जास्त  आहे की अनेक ठिकाणी कार आणि दुचाक्यासुद्धा वाहून गेल्या आहेत. शहरातील रस्ते जमलय झाल्याने लोकांना रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. हीच स्थिती लोकांच्या घरांचीही आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.

हैदराबादमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठा अपघात झाला आहे. बदलागुडा येथे भिंत कोसळल्याने 2 महिन्यांच्या मुलासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्या शहरातील चंद्रमुत्ता पोलिस स्टेशन परिसरातील मोहम्मदिया हिल्स भागात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हैदराबादसह तेलंगानाच्या इतर भागातही चालू असलेल्या पावसामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. हैदराबाद व इतर बर्‍याच भागात गेल्या 24 तासांत 20 सें.मी. पाऊस पडला आहे.

पहा व्हिडिओ -

काल रात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत व बचाव दल नौका वापरत आहेत. राज्यातील आपत्ती निवारण दल व अग्निशमन सेवा पथकाने टोली चौकी परिसरात बचाव मोहीम राबवून लोकांना बाहेर काढले. तेलंगणा सरकारने सर्व खासगी संस्था/कार्यालये/अनावश्यक सेवांमध्ये काम करणारे लोक यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगू, आज आणि उद्या सुट्टीची घोषणा केली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणा आणि ओडिशाच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका यांनी ट्विट केले आहे की, ‘एलबी नगरमध्ये 25 सेमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस काही तास सुरू राहू शकेल. लोकांनी घरातच सुरक्षित राहावे.’