Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यभरात मराठा आंदोलन पेटलेलं आहे, आज राष्ट्रवादी आमदारांच्या घराला आग लावल्यानंतर बीड आणि संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. यातच हिंगोलीमध्ये भाजपच्या कार्यालयाला आग लावण्याची घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ही आग लावण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरांमध्ये हे भाजप कार्यलय आहे. या कार्यालयाला थोड्याच वेळापूर्वी दोन ते तीन जणांनी आग लावण्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तातडीने पोलिसांनी ही आग भिजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ही आग नेमकी कोणी लावली हे अद्याप कळू शकलेलं नाही.  (हेही वाचा - Maratha Reservation: बीडमध्ये आंदोलकांनी लावली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला आग; शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू (Video))

आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची कार्यलय आणि घरेही जाळण्यात आली. तर बीडमध्ये हिंसक आंदोकानी अग्निशमन दलाच्या गाडीलाच आग लावल्याची घटना घडली आहे.  आंदोलक इतके आक्रमक झाले आहेत की, त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत वाहनांना आग लावली.