Heavy Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) पुढील दोन ते तीन दिवसांत अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये, नैऋत्य मान्सून वायव्य भारत आणि शेजारील मध्य भारतातील आणखी काही प्रदेशांमधून निघून जाईल, असे हवामान विभागाने (IMD) आपल्या अंदाजात म्हटले आहे. हवामान विभागाने 28 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका माहितीत हा अंदाच व्यक्त करण्यात आला आहे.

समुद्र किनारपट्टीलगतचा आंध्र प्रदेश आणि यानम, तेलंगणा आणि रायलसीमा येथे उद्यापर्यंत हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर-मध्य कर्नाटक तसेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये आज आणि उद्याचा हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत, ओडिशा, तसेच झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी दमदार सरींसह मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या/मध्यम पावसाचा अंदाज आहे. (हेही वाचा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 लाख हेक्टरवर शेतीला दुष्काळाचा बसला तडाखा, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाची माहिती)

दरम्यान, 2 ऑक्टोबर 2022 रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये हलका/मध्यम पाऊस काही ठिकाणी मुसळधार सरी आणि गडगडाटी वादळ/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.