हल्दीराम भुजियावाला (Haldiram Bhujiawala), प्रतीक फूड प्रॉडक्ट्स चे मालक महेश अग्रवाल (Mahesh Agarwal) यांचे शुक्रवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये (Singapore) निधन झाले. यकृताच्या गंभीर आजारामुळे ते त्रस्त होते व गेल्या तीन महिन्यांपासून सिंगापूर इथल्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार चालू होते. अग्रवाल शनिवारी 57 वर्षांच्या होणार होते. सध्याची परिस्थिती पाहता सिंगापूरमध्येच, त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या नियमांच्या आधारे शुक्रवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. महेश अग्रवाल यांच्यावर हिंदू रितीनुसार अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळाली नाही. अग्रवाल यांची पत्नी मीना आणि मुलगी अवनी आपल्या वडिलांसोबत सिंगापूरमध्ये हजर होते.
आता महेश यांच्या पत्नी आणि मुलीची भारतात येण्याची इच्छा आहे, पण सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही. या दोघींनीही भारतीय दूतावासात भारतात आपल्या घरी परत जाण्यासाठी अर्ज केला होता. मंगळवारपासून सिंगापूर येथे लॉकडाऊन सुरु होणार आहे. त्यामुळे या दोघींचे भारतात येणे अबघाद झाले आहे. मात्र वृत्तानुसार, बुधवारी पहाटे त्यांना दिल्लीत परत घेऊन येण्यासाठी विमानाचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
अग्रवाल यांना यकृताचा गंभीर आजार होता आणि जानेवारीत सिंगापूरच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली परंतु त्यानंतर एक संसर्ग उद्भवल्याने विकसित झाला ज्यामुळे त्याला आयसीयूमधून अति उच्च दक्षता विभागात हलवण्यात आले. अग्रवाल यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी कोरोना व्हायरसची 120 नवी प्रकरणे समोर आल्याचे सांगितले. सध्या इथे एकूण संक्रमित रुग्णान ची संख्या 1309 झाली आहे.