उद्योगपती मुकेश अंबानी यांना अनेक धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधील गांधीनगर येथून एका आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपींनी उद्योगपती मुकेश अंबानी यांना 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान दोन धमकीचे ईमेल पाठवले होते. धमकी देणाऱ्या मेलमध्ये त्याने आधीच्या ईमेलकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता. मेलमध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी कारवाई करत त्याला गुजरातमधील गांधीनगर येथून अटक केली. (हेही वाचा - Mukesh Ambani यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील 19 वर्षीय तरुणाला अटक)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)