केंद्र सरकारमधील नरेंद्र मोदींच्या सरकारसाठी एक दिलासादायक बाब आहे. भारताचा फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर मागील महिन्याच्या तुलनेत खाली उतरला आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर 2.26% असून जानेवारी महिन्यातील हा दर 3.1% इतका होता. दरम्यान रिटेल इन्फेलशन असल्याने फेब्रुवारी महिन्यात तो देखील मागील दोन महिन्यांच्या तुलनेत निच्चांकावर आहे. सरकारी माहितीनुसार, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू आणि अन्य अत्यावश्यक सामानांची किंमत कमी झाल्याने ही घट झाली आहे. Retail Inflation फेब्रुवारी महिन्यात 6.58% इतका नोंदवण्यात आला आहे. हाच जानेवारी महिन्यात 7.59% इतका नोंदवण्यात आला आहे. तर मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये हा 2.57% इतका होता.
ANI Tweet
Government of India: Wholesale inflation down to 2.26% in February as compared to 3.1% in the previous month pic.twitter.com/v7anETdm3M
— ANI (@ANI) March 16, 2020
सध्या आरबीआयकडून मिडियम टर्म गोल नुसार Retail Inflation हा 4% राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. Ministry of Commerce and Industry
कडून महागाई दराबाबत माहिती दिली जाते. आज नुकतीच फेब्रुवारी 2020 महिन्याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वर्ष 2020 च्या दुसर्या महिन्यात महागाईचा दर ओसरताना दिसत असल्याने ही दिलासादायक बाब आहे.