केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली (Onion Export) बंद हटवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे. देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत ठेवली होती, परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा हा मिळाला आहे. (Nashik Onion Market: नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार, व्यापाऱ्यांचा संप मागे)
गुजरात आणि महाराष्ट्राती कांद्याचा स्टॉक पाहात सरकारकडून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविय यांनी कंद्रीय गृहमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिली होती. यापूर्वी देखील केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरी बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगतले जात होते. कांद्याच्या किमती कोसळल्यानं देखील निर्यातबंदीचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
बंदी हटवण्यासोबतच तीन लाख मेट्रीक टन कांदा निर्यातीला देखील मंजूरी दिली आहे. यासोबत बांग्लादेश मध्ये देखील 50 हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कांद्याचे कमी उत्पादन आणि भरमसाठ वाढलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात 8 तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.