Google Employee: नोकरी सोडण्याचा इशारा देताच गूगलने कर्मचाऱ्याचा पगार 300 % वाढवला, कारण घ्या जाणून
Sundar Pichai, Google (फोटो सौजन्य - Instagram, Pixabay)

जर तुम्ही काम सोडण्याचा विचारात असाल आणि कंपनीला याबद्दल तुम्ही माहिती दिल्यास कंपनीकडून तुमची काय अपेक्षा असेल. अशा वेळी अनेकदा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा देतात किंवा त्यांना कामावरुन कमी करण्यासाठी दंड म्हणून पैसे देखील पगारातून कापू शकतात. यासर्व विरोधात गुगलने कंपनी (Google) सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला जास्त पगार दिला. कर्मचाऱ्याला (Employee) जेवढे वेतन मिळत होते त्यापेक्षा चारपट पगार जास्त दिला, जेणेकरून त्याला कंपनीत कायम ठेवता येईल. (Nike Layoffs 2024: स्पोर्ट्सवेअर कंपनी नायके 2 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; खर्च कमी करण्यासाठी घेतला निर्णय)

अमेरिकेतील एका स्टार्टअपच्या सीईओने सांगितले की, कर्मचारी कपात होत असतानाच्या काळात गुगलने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पगाराच्या चौपट पगार वाढवला. पर्पलेक्सिटी एआय स्टार्टअपचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनी ॲलेक्स कॅन्ट्रोविट्झद्वारे होस्ट केलेल्या बिग टेक्नॉलॉजी पॉडकास्ट शोवर खुलासा केला. Google कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाशी संपर्क साधला जेणेकरून तो नोकरी सोडण्याची नोटीस देऊ शकेल. मात्र कर्मचाऱ्याची नोटीस किंवा राजीनामा स्वीकारण्याऐवजी गुगलने त्याला मोठी ऑफर देऊन थांबवले.

एकीकडे गुगलने गेल्या दीड महिन्यात 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, तर दुसरीकडे एका कर्मचाऱ्याला कायम ठेवण्यासाठी 4 पट पगार देऊ केला आहे. ज्यांचा पगार खूप जास्त आहे, पण ते तेवढे आउटपुट देत नाहीत, अशा लोकांना गुगल कामावरून काढून टाकत आहे.