सेंट्रल ब्यूरो इन्वेस्टीगेशनचे (Central Bureau of Investigation) माजी डिरेक्टर अश्वनी कुमार (Ashwani Kumar) यांचे आज (बुधवार, 7 ऑक्टोबर) निधन झाले आहे. शिमला (Shimla) येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह आढळला. कुमार यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे शिमलाचे पोलिस अधीक्षक मोहित चावला (Mohit Chawla) यांनी दिली आहे. कुमार यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आयपीएस अधिकारी असलेल्या अश्वनी कुमार यांची 2006 मध्ये हिमाचल प्रदेशचे पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2008 मध्ये बढती करुन सीबीआयच्या महासंचालक पदाची धुरा त्यांच्या हाती सोपवण्यात आली. नोव्हेंबर 2010 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी अगदी चोख बजावली. त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली.
ANI Tweet:
Former Governor of Manipur and Nagaland, and Ex-CBI Director Ashwani Kumar found hanging at his residence in Shimla: Mohit Chawla, SP Shimla. #HimachalPradesh
— ANI (@ANI) October 7, 2020
2013 मध्ये ईशान्यकडील मणिपूर आणि नागालँड या दोन राज्यांचे राज्यपाल पद कुमार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. राजभवनातील त्यांच्या कारकीर्दीनंतर कुमार हे जनतेपासून लांब राहिले. आपल्या आयुष्यातील बराच काळ शिमला येथे व्यक्तीत केल्याने त्यांनी निवृत्तीनंतर शिमला येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.