Underwater Metro (Photo Credits-Twitter)

भारतात लवकरच पाण्याखालून धावणारी मेट्रो  दिसून येणार आहे. पाण्याखाली धावणारी मेट्रो कोलकाता (Kolkata) मधील हुगली नदीच्या (Hugli River) भुगर्भातून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेने तयारी करण्यास सुरुवात केली असून या मेट्रोसाठी खास भोगदा खणण्यात येणार आहे. खणण्यात येणारा हा भोगदा 520 मीटर लांब आणि 30 फुट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. या मेट्रोबद्दल खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कोलकाता मधील पाण्याखालून जाणारी ही मेट्रो सॉल्ट सेक्टर 5 ते हावडा मैदान दरम्यान 16 किमी अंतर पार करणार आहे. मेट्रोच्या पहिली फेज कोलकाताकरांसाठी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच पाण्यापासून बचाव करण्यासाठी 4 हायटेक सुरक्षा कवच भोगद्यात लावण्यात येणार आहे.(आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी आता 4 तास आधी विमानतळावर पोहचावे लागणार)

मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोला हा भोगदा पार करण्यासाठी फक्त एकच मिनिट लागणार आहे. हुगली नदीच्या पाण्याखालून चालण्यात येणारी ही मेट्रो एक हायटेक्नॉलीजे उत्तम प्रतीक असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. यापूर्वीसुद्धा पाण्यावरुन चालणारे विमान तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. मात्र येणाऱ्या भावी काळात देशात उडणाऱ्या बसचे तंत्रज्ञानसुद्धा विकसित केले जाणार आहे.