भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (15 मे) 4 वाजता पत्रकार परिषदेमध्ये आत्मनिर्भर भारत अभियान (Atma Nirbhar Bharat Abhiyan) अंतर्गत आर्थिक तरतुदींचा तिसरा टप्पा जाहीर करणार आहेत. यापूर्वी उद्योग, शेतकरी आणि स्थलांतरित मजुरांसाठी भारत सरकारने आर्थिक पॅकेजमधील तरतुदींची घोषणा केली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संकटामध्ये सामान्य नागरिक, गोर गरिबांना होणारा नाहक त्रास पाहता सरकारने 20 लाख कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
भारत सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी आता रेशनकार्ड शिवाय देशात कुठूनही अन्नधान्य खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान यामध्ये नागरिकांना प्रति माणसी 5 किलो गहू किंवा तांदूळ, 1 किलो चणा डाळ मिळणार आहे. तसेच काल वन नेशन वन रेशन कार्डचीदेखील घोषणा करण्यात आली. यामध्ये आता Kisan Credit Card scheme जाहीर करण्यात आली. One Nation One Ration Card: देशभरातील सुमारे 67 कोटी जनता येणार 'वन नेशन - वन राशन कार्ड' कक्षेत.
ANI Tweet
Finance Minister Nirmala Sitharaman will address a press conference today at 4 PM. #EconomicPackage (file pic) pic.twitter.com/EoR4EBdyDb
— ANI (@ANI) May 15, 2020
दरम्यान भारताला आता आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आहे. कोरोना व्हायरस आरोग्य संकटासोबत संधी घेऊन आलं आहे. त्यामुळे आता याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे असा विश्वास नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिला आहे. पहिल्या दोन टप्प्यातील आर्थिक पॅकेजमधील घोषणांनंतर महाराष्ट्रातदेखील देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरासाठी विशेष पॅकेजची घोषणा करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81970 पर्यंत पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये मागील 24 तासामध्ये 3967 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 100 नव्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये सध्या 51,401 रूग्णांवर उपचार सुरु असून सुमारे 27 हजार 920 रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.