Manmohan Singh to be cremated on December 28 (Photo Credits: X/ANI)

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr Manmohan Singh) यांच्या पार्थिवावर 28 डिसेंबरला अंत्यविधी होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहखात्याकडून देण्यात आली आहे. डॉ. सिंह यांचे काल (26 डिसेंबर) दिल्लीत एम्स रूग्णालयामध्ये निधन झाले आहे. आज  दिवसभर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी समवेत अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. आता सिंह यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11.30 वाजता Nigambodh Ghat crematorium मध्ये अंत्यविधी होतील असे सांगण्यात आले आहे. 

डॉ. सिंह यांच्यावर संपूर्ण  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्याची विनंती संरक्षण मंत्रालयाला करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या दिल्लीत अंत्यसंस्कारांची तयारी केली जाणार आहे. नक्की वाचा: Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावले- राहुल गांधी .

मनमोहन सिंह यांच्यावर कुठे होणार अंत्यसंस्कार?  

वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेले डॉ. मनमोहन सिंह यांनी 2004-2014 दरम्यान देशाचं पंतप्रधान पद भूषवलं आहे. सोबतच त्यांनी यापूर्वी 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री पद भूषवलं होतं. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य  असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते. 1982-85 दरम्यान ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देखील होते.