Deepotsav (Photo Credits: IANS)

यावेळी उत्तर प्रदेशमधील रामाची नगरी अयोध्या (Ayodhya) मध्ये कोरोना विषाणू साथीच्या दरम्यान दीपोत्सव (Deepotsav 2020) साजरा केला जाणार आहे. दीपोत्सवाचे हे चौथे वर्ष अधिक भव्य पद्धतीने साजरे करण्याची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी मंडळाच्या अध्यक्षतेखाली दीपोत्सव समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम 13 नोव्हेंबरला होणार असल्याचे बैठकीत ठरले. एक दिवस अगोदर साकेत कॉलेज ते नया घाट दरम्यान, रामायण या थीमवर आधारित मिरवणुका निघतील. यावेळी अयोध्येत दीपोत्सवात शरयू काठी 5.50 लाख दिवे लावून रोषणाई करण्यात येणार आहे. 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान दीपोत्सव आयोजित केला जाईल.

महत्वाचे म्हणजे, यंदा या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाईल. विविध ठिकाणी एलईडी व्हॅन लावल्या जातील, जेणेकरून लोक उत्सव पाहू शकतील. कोविड-19 मुळे या कार्यक्रमात सर्वसामान्यांचा खूप मर्यादित सहभाग असेल. कोविड प्रोटोकॉल फॉलो करून शरयूच्या काठी भव्य उत्सव कसा साधायचा यावरही चर्चा झाली. यंदा दिव्यांचे मागच्या वर्षीचे रेकॉर्ड मोडले जाणार आहे. मुख्यमंत्री योगींचा ड्रिम प्रकल्पांपैकी एक असलेल्या अयोध्या दीपोत्सव कार्यक्रमाला राज्य जत्रेचा दर्जा मिळाला आहे.

यावेळच्या दीपोत्सव कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे दीपोत्सवाच्या एक दिवस आधी काढण्यात येणारी मिरवणूक ही असेल. याशिवाय राम कथा पार्क येथे राम राज्याभिषेक आणि सरयू घाट येथील राम की पैड़ी येथे 5 लाख दिवे लावून दीपोत्सव कार्यक्रम होणार आहेत. यावेळी दीपोत्सव तीन दिवसांचा असणार असल्याची माहिती मंडळायुक्त खासदार अग्रवाल यांनी दिली. जिल्हाधिकारी अनुज झा म्हणाले की, मास्कशिवाय कोणालाही कार्यक्रमात प्रवेश घेता येणार नाही. कोविड हेल्प-डेस्क सर्व ठिकाणी स्थापित केले जाईल, तसेच सॅनिटायझर्स आणि मास्कही असतील. (हेही वाचा: दस-या निमित्त यंदा गुळाची दशमी, कुंदा, कराची हलवा यांसारख्या लज्जतदार रेसिपीजनी वाढवा या सणाचा गोडवा!)

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून डीआयजी दीपक कुमार म्हणाले. या कार्यक्रमात तेच लोक प्रवेश करू शकतील, ज्यांच्याकडे जिल्हा प्रशासनाकडून दिलेले ओळखपत्र असेल. अयोध्येत येणार्‍या प्रत्येक मार्गावर सुरक्षा व्यवस्था असेल. अयोध्या व आसपासच्या भागात महापालिका कर्मचारी वेळोवेळी सफाई करणार आहेत.