PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

Cyclone Yaas: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) येथे यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे हवाई पहणी केली. त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासह तत्काळ 1 हजार कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. यामधील 500 कोटी रुपये ओडिशा आणि 500 करोड बंगाल-झारखंड राज्यासाठी दिले आहेत. पीएम मोदी यांनी शुक्रवारी भुवनेश्वर मध्ये एक आढावा बैठक घेतली. त्यांनी बचाव कार्यासंबंधित करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची माहिती घेतली.

नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि झारखंड यांना जरुर मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. नुकसान भरपाईच्या आकलनासाठी एक टीम तयार केली जाणार आहे. या व्यतिरिक्त मोदी यांनी यास चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.(Cyclone Yaas: यास चक्रिवादळात ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यात मोठा परिसर पाण्याखाली)

Tweet:

तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना माहिती नव्हते की त्यांची मोदी यांच्यासोबत बैठक आहे. त्यांनी असे म्हटले की, पीएम यांनी बैठक बोलावली आहे. मला माहिती नव्हते की, मिटींग दीघा येथे आहे. पंतप्रधानांना रिपोर्ट दिला असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तर दीघा आणि सुंदरबनच्या विकासासाठी 20 हजार कोटी आणि 10 हजार कोटी रुपयांची मागणी बॅनर्जी यांनी मोदी यांच्याकडे केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की, त्या सुद्धा यास चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या क्षेत्राची हवाई पहाणी करणार आहे. तर बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळादरम्यान केंद्र सरकारवर फंड संदर्भात आरोप लावला होता. त्यांनी ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा उल्लेख करत म्हटले की, पश्चिम बंगाल सोबत भेदभाव केला जात आहे. तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशासाठी प्रत्येकी 600 कोटी रुपये तर पश्चिम बंगालसाठी फक्त 400 कोटी रुपये दिले गेले.