Cyclone Asani Update: असानी चक्रीवादळाचा धोका वाढला, अंदमान निकोबार येथे अनेक ठिकाणी पाऊस सुरु, NDRF कडून अलर्ट जारी
Cyclone Asani | (Photo Credits: Twitter)

'असानी' चक्रिवादळ अंदमान आणि निकोबार (Andaman And Nicobar) बेटांना धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने रविवारी सकाळी म्हटले की, दक्षिण-पूर्व बंगालची खाडी (Bay of Bengal) आणि त्यालाच लागून असलेल्या दक्षिण अंदमान समुद्रावर (Andaman Sea) निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) एक पोकळी (Depression) तया झाली आहे. पुढच्या 24 तासात हा प्रदेश हवेच्या एका मोठ्या पोकळीत (Deep Depression) बदलण्याची शक्यता आहे.

आयएमडीने (IMD) आगोदरच अंदाज वर्तवला आहे की, ही पोकळी 21 मार्च पर्यंत एका चक्रवती वादळात परावर्तीत होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूह आणि समुद्र किनारपट्टीवर हे वादळ वेगाने पोहोचेल. त्यानंतर हे वादळ उत्तर उत्तर पूर्व दिशेने वाढण्याची आणि 22 मार्च पर्यंत उत्तर मॅनमार येथे दक्षिण-पूर्व बांगलादेश किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अंदमान आणि नकोबार बेटांच्या समूहामध्ये हे वादळ धडकण्याची संभाव्य शक्यता विचारात घेऊन अपत्ती निवारन विभागाने जोरदार तयारी केली आहे.

'असानी' चक्रिवादळ केंद्रस्थानी ठेऊन आपत्ती निवारन विभाग (एनडीआरएफ) च्या सहा तुकड्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या जवळ तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यासोबच स्थानिक प्रशासनानेही लोकांना संभाव्य प्रादुर्भावाचा फटका बसू शकणाऱ्या ठिकाणाहून सुरक्षीत ठिकाणी हालविण्या सुरुवात केली आहे. प्रशासनाने समुद्र प्रवास आणि नौकायन करण्यासही बंदी घातली आहे. प्रामुख्याने पोर्ट ब्लेयर आणि आसपासच्या बेटांमध्ये वाहतूक सेवा स्थगित कल्या आहेत. गरज पडल्या संपर्कासाठी प्रवासी आणि स्थानिकांना हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करुन दिले आहेत. गरजू लोक 03192-245555/232714 आणि टोल-फ्री नंबर- 1-800-345-2714 यांवर संपर्क करु शकतात.