1 ऑक्टोबर पासून आता क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड (Debit Card) आणि प्रिपेड कार्ड ( Prepaid Card) ग्राहकांना आता त्यांचे नेटवर्क पोर्ट करता येणार आहे. म्हणजेच तुमचे कार्ड Visa असेल तर ते मास्टर कार्ड किंवा रुपे करता येणार आहे. Reserve Bank of India च्या नुकत्याच जारी परिपत्रकामध्ये याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या भारतामध्ये 5 क्रेडिट कार्ड नेटवर्क्स आहेत. Visa, MasterCard, RuPay, American Express आणि Diner’s Club ची कार्ड्स दिली जातात. आता आरबीआय च्या प्रस्तावानुसार 1 ऑकटोबर पासून यापैकी कोणतेही कार्ड पोर्ट करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
कार्ड जारी करणार्यांना त्यांच्या पात्र ग्राहकांना एकापेक्षा अधिक कार्ड नेटवर्कपैकी कोणतेही एक निवडण्याचा पर्याय आता दिला जाणार आहे. हा पर्याय ग्राहक जारी करताना किंवा त्यानंतरच्या कोणत्याही वेळी वापरू शकणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. नक्की वाचा: Online Payment Rule Changes: Debit Card, Credit Card ऑनलाईन पेमेंट नियमात पुढील महिन्यापासून बदल, घ्या अधिक जाणून .
कार्ड पोर्ट केले तरीही ग्राहकांची त्यामधील शिल्लक रक्कम, क्रेडिट कार्ड हिस्ट्री यामध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्याच्या प्रक्रियेमध्ये कार्ड जारी करणार्या संस्था, नेटवर्क आणि ग्राहक यांच्यामध्ये निवडीची पर्याय ग्राहकांकडे नाही. ही गोष्ट ग्राहकांच्या दृष्टीने अनुकूल नसल्याने आता आरबीआय हे मह्त्त्वपूर्ण बदल करत आहे.