जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांच्या लपण्याच्या जागेवरून CRPF जवानांनी जप्त केल्या AK-47 च्या 26 गोळ्या आणि एका दहशवाद्याला केली अटक
Jammu Kashmir Terrorist Hide Place (Photo Credits: ANI/Twitter)

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांच्या मुस्क्या आवळण्यासाठी CRPF जवानांनी आज एक मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरच्या पंचोर येथे आज अवंतीपोरा पोलिसांनी 50 RR आणि 110 BN सीआरपीएफ जवानांसह दहशतवाद्यांच्या लपायच्या एका जागेवर धाड टाकली. यावेळी एक या जवानांनी एका घरातील गोठ्यामध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या छुप्या जागेची माहिती मिळाली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या जागेत लपलेला एक दहशतवादी देखील पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याचबरोबर लष्कर ए तोयबाच्या AK-47 च्या 26 गोळ्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली. यात CRPF जवान आणि अनेक पोलिस अधिका-यांचा देखील समावेश आहे. अवंतीपोरा पोलिसांनी सीआरपीएफ जवानांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.हेदेखील वाचा- जम्मू-कश्मीर: नवजात बालक आणि मातेला घरी सुखरुप पोहचवण्यासाठी जवानाची बर्फाच्छादित रस्त्यावरुन 3.5 किमी ची पायपीट (See Pics)

पोलिसांना एका घरातील गोठ्यात दहशतवाद्यांचा लपण्याची जागा सापडली. येथे एक दहशतवादी आधीच लपला होता. जवानांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून लष्कर ए तोयबाच्या अन्य जागांविषयी माहिती मिळवली. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी आणि जवानांनी काळजीपूर्वक ही कारवाई केली. पोलिसांसाठी ही प्रकरण खूपच धक्कादायक होते. पोलिस आणि CRPF जवान या परिसरातील अन्य घरांची देखील झडती घेत आहेत.