Congress leader's son hits bike rider in Karnataka (फोटो सौजन्य - X/@ashu87kumar)

Karnataka Hit-And-Run: देशभरात हिट अँड रन (Hit-And-Run) च्या घटना समोर येत आहेत. बुधवारी कर्नाटक (Karnataka) मध्ये एका काँग्रेस नेत्याच्या मुलाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेनंतर काँग्रेस नेते देवीप्रसाद शेट्टी यांचा मुलगा प्रज्वल शेट्टी (वय, 26) याला एका दिवसानंतर अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी प्रज्वल शेट्टी थार एसयूव्ही चालवत होता. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याने एका दुचाकीला कारने धडक दिली आणि तेथून पळ काढला.

जवळच्या घरातून टिपलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एसयूव्ही भरधाव वेगात रस्त्यावरून दुचाकीला धडकताना दिसत आहे. या धडकेत दुचाकीस्वार 39 वर्षीय मोहम्मद हुसेन हा गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र एका दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. आरोपीला शिरवा पोलिसांनी गुरुवारी अटक केली, मात्र काही वेळाने त्याला जामीन मिळाला. (हेही वाचा - Thane Hit-And-Run: ठाणे येथे हिट अँड रन अपघातात 21 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू)

कर्नाटकात काँग्रेस नेत्याच्या मुलाने दिली बाईकस्वाराला धडक, पहा व्हिडिओ -

प्रज्वल शेट्टी यांचे वडील देवीप्रसाद शेट्टी हे उडुपीच्या बेलापू गावातील प्रसिद्ध काँग्रेस नेते आहेत. गेल्या महिन्यात, मंगळुरू या किनारपट्टीच्या शहरातून आणखी एक हिट अँड-रनची घटना नोंदवली गेली होती. भरधाव वेगात असलेली कार फूटपाथवर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर 4 जण गंभीर जखमी झाले होते. जुलैमध्ये रायचूर जिल्ह्यात एका भरधाव कारने दुचाकी आणि दोन विद्यार्थ्यांना धडक दिली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहतुकीकडे लक्ष न देता अचानक यू-टर्न घेतल्याने हा भीषण अपघात घडला होता.