Piyush Goyal And Uddhav Thackeray (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही दुप्पट वेगाने आली असून या लाटेत आतापर्यंत असंख्य नागरिकांचा जीव गेला आहे. वैद्यकिय सुविधा अपु-या पडत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याची टिका विरोधकांकडून होत आहे. दरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री पीयूष गोयल यांच्यावर सडकून टिका केली आहे. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) केंद्राला राजकारणाचे डोस देणं थांबवून राज्याची जबाबदारी घ्यावी" असे पीयूष गोयल आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहेत.

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.हेदेखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्राला Remdesivir देऊ नका, अन्यथा परवाना रद्द करु, केंद्राचा औषध कंपन्यांवर दबाव; नवाब मलिक यांचा आरोप

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून क्षुल्लक राजकारणाचे खेळ पाहून आश्चर्यचकित आणि दु: खी झालो. त्यांनी राजकारणाचे रोजचे डोस देणं थांबवून जबाबदारी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सध्या अपंग व भ्रष्ट सरकारचा त्रास सहन करीत आहे आणि केंद्र जनतेसाठी चांगले प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील लोक ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ कर्तव्यदक्षपणे अनुसरण करीत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझं राज्य, माझी जबाबदारी’ या भावनेने कर्तव्य बजावावे असेही ते या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले आहेत.