केंद्र सरकार कर्मचारी, पेंशनधारकांच्या 1 जानेवारी 2020 पासून वाढीव DA, DR च्या हप्तांना वर्षभरासाठी स्थगिती; अर्थ मंत्रालयाची माहिती
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएच्या अतिरिक्त हफ्त्याला स्थगिती दिली आहे. आज जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, 1 जानेवारी 2020 पासूनची जाहीर करण्यात आलेल्या डीएच्या रक्कमेचा हप्ता सोबतच 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 च्या अ‍ॅडिशनल डीए (Dearness Allowance) आणि डीआरच्या (Dearness Relief) रक्कमेला देखील स्थगिती दिली आहे. मात्र कर्मचारी आणि पेंशनधारकांना सध्याच्या डीएच्या टक्क्यांनुसार त्याचे पैसे दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान मार्च 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीए मध्ये 4% वाढ करण्यात आली होती. ही वाढ कर्मचार्‍यांसह पेंशन धारकांना जानेवारी 2020 पासून लागू होणं अपेक्षित आहे. मात्र आता हा वाढीव भत्ता देण्याला सरकारने स्थगिती दिली आहे. सराकारी कर्मचार्‍यांना वर्षभरातील महागाईचा दर पाहता जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ करून दिली जाते. मात्र यंदा पुढील आदेशापर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली आहे. 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

ANI Tweet

आज अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचा एका दिवसाचा पगार मार्च 2021 पर्यंत नियमित कोव्हिड 19 च्या लढाईसाठी आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे. देशामध्ये 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेंशनधारक आहेत.  महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्याने तिजोरी वर सुमारे 14,500 कोटींचा भार पडणार होता.