Pregnancy. (Photo Credit: Pixabay)

जगात कोणी कोणावर प्रेम करावे याला काही नियम नाही. मात्र रिलेशनशिपमध्ये कधी कधी आपल्या चुकीमुळे अशा समस्या निर्माण होतात, ज्या निस्तरणे कठीण जाऊ शकते. नुकतेच तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यात याबाबतचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. गर्लफ्रेंड (Girlfriend) गर्भवती झाल्यावर प्रियकराने चक्क युट्यूबच्या (Youtube) मदतीने तिची प्रसूती (Delivery) करण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की, यामध्ये अर्भकाचा मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर आता गर्लफ्रेंड रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे. चेन्नई येथील रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी प्रियकरावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी हा एक 27 वर्षांचा युवक असून, तो एलपीजी सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा व मुलगी पोंनेरी गावात एकमेकांचे शेजारी आहेत. दोघांचे जवळजवळ 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर मुलीला दिवस गेले व बघता बघता डिलिव्हरीची वेळ आली. घरच्यांना या गोष्टी माहिती होऊ नये म्हणून या युवकाने स्वतः डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला व त्याने प्रेयसीलाही त्यासाठी तयार केले. (हेही वाचा: जन्म घेतल्यानंतर रडण्याऐवजी रागवलं नवजात बाळ; पहा व्हायरल फोटो)

त्याने ग्लव्हज, सर्जिकल ब्लेड, कात्री आणि सर्जिकल जेलही विकत घेतले होते. जेव्हा मुलीच्या पोटात दुखू लागले तेव्हा त्याने तिला शेजारील काजूच्या वागेत नेले व यूट्यूब सुरु करून डिलिव्हरी सुरु केली. मात्र जेव्हा बाळाच्या डोक्याऐवजी जेव्हा हात बाहेर आला तेव्हा नक्की काय करायचे हे त्याला समजले नाही. त्याने मुलीचा प्रायव्हेट पार्ट कट करून बाळाचा हात बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये मुलीला रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर मात्र त्याने मुलीला चादरीमध्ये गुंडाळून रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. सध्या या मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून दोघांच्या कुटुंबाकडेही चौकशी सुरु आहे.