Photo Credit- X

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रतलाममधून एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक 16 वर्षांचा मुलगा 6, 9 आणि 11 वर्षाच्या तीन मुलांना चप्पलने वारंवार मारहाण (Teen attacks three boys)करत आहे. त्यांना धार्मिक घोषणा (Religious Slogan) देण्यास जबरदस्ती केली. किशोरवयीन मुलाने तीन मुलांशी शाब्दिक शिवीगाळ केली. ती मुले धुम्रपान करत होते. किशोरवयीन मुलगा तेथे गेला. त्याने त्या मुलांच्या नातेवाईकांचे फोन नंबर मागितले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला आणि आणखी एका 14 वर्षीय किशोरवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्हिडिओ रतलाममधील अमृतसागर तलावाजवळील एका निर्माणाधीन उद्यानातील असल्याची माहिती आहे. शहरातील मानकचौक परिसरातील रहिवासी मुले रडताना, घोषणाबाजी करताना आणि किशोरवयीन मुलाच्या हल्ल्यांपासून त्यांना वाचवताना दिसतात.

व्हिडीओमध्ये मुले आम्ही पुन्हा धुम्रपान करणार नाही असे म्हणताना दिसतात. ही घटना दीड महिन्यापूर्वी घडली. मात्र नुकताच हा व्हिडीओ समोर आला. ज्यामुळे लोक संतापले होते. गुरुवारी रात्री स्थानिक पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला. ज्यामुळे तेथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.