
Bollywood Actress Attacked In Hyderabad Hotel Room: हैदराबादमधून (Hyderabad) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंजारा हिल्सजवळील (Banjara Hills) मसाब टँक येथील तिच्या हॉटेलमध्ये दुकानाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या एका बॉलीवूड अभिनेत्रीवर हल्ला करून तिला लुटण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वृत्तानुसार, रात्री उशिरा अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत घुसले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्रीकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले. यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलने वृत्त प्रकाशित केलं आहे.
अभिनेत्रीचे हातपाय बांधले -
पीडित अभिनेत्रीच्या तक्रारीनुसार, दोन महिला आणि दोन तरुण तिच्या हॉटेल रूममध्ये घुसले. त्यांनी अभिनेत्रीला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला तेव्हा त्यांनी तिचे हातपाय बांधले, तिच्या बॅगेतील रोख आणि सोने लुटले आणि तेथून पळ काढला. (हेही वाचा -Singing Not Sexual Harassment: केसांवरुन गाणे गाणे म्हणजे लैंगिक छळ नव्हे- मुंबई उच्च न्यायालय)
आरोपींविरोधात गुन्हा दाखल -
दरम्यान, तेलुगु स्क्राइबच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर अभिनेत्रीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडित अभिनेत्रीच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. संशयितांची ओळख पटविण्यासाठी पोलिस अधिकारी हॉटेल आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.