‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व दिवसेंदिवस आणखी रंजक होत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या सुरुवातीपासून निक्की तांबोळी व अरबाज पटेलमधील मैत्रीण पाहायला मिळत आहे. अरबाज अनेकदा घरात निक्कीबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसला. त्यामुळे निक्की व अरबाजमधील मैत्री आणखी चांगली निर्माण झाली. अशातच आता निक्की तांबोळी व अरबाज पटेलच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमधून दोघांत कडाक्याचं भांडण झाल्याच समोर आलं आहे.  (हेही वाचा -  )

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की व अभिजीतची मैत्री अरबाजला खटकली होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता पुन्हा एकदा या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकताच निक्की-अरबाजच्या भांडणाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये निक्की हात जोडून अरबाजला म्हणते की, अरबाज पूर्ण घराकडे जा माझ्याकडे येऊ नको. त्यानंतर अरबाज निक्कीला समजवताना पाहायला मिळत आहे. “जसं मी तुझ्याबरोबर वागतो ना, तसंच मी तिच्याबरोबरही वागणार…” पण तरीही निक्कीचा राग शांत होत नाही.

दरम्यान, निक्की व अरबाजमध्ये वाद नेमकं कोणामुळे झाला? हे आजच्या भागात समजेल. पण हे भांडण आर्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.