Photo Credit- X

Baaghi 4: टायगर श्रॉफची हिट चित्रपट सीरिज बागीचा चौथा भाग लवकरच येणार आहे. सुधीर बाबू, मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यानंतर आता संजय दत्त बागी 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संजय दत्त चित्रपटात दिसणार असल्याने त्याचे चाहते आतूर आहेत. सोमवारी चित्रपटाते पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यात संजय दत्तला पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

ॲक्शन थ्रिलर बागी फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता खलनायकाचा चेहराही समोर आला आहे. सिनेविश्वातील खरा 'खलनायक' असे म्हणत संजय दत्त साजिद नाडियादवालाच्या बागी 4 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, जे पाहून सगळेच थरथर कापत आहेत.

गेल्या महिन्यात टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट बागी 4 ची घोषणा करण्यात आली होती. यावेळी खलनायकही जबरदस्त असेल असे सांगण्यात आले होते. संजय दत्तच्या एँट्रीने चित्रपट चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे.

बागी 4 मध्ये संजय दत्तची एन्ट्री

सोमवारी टायगर श्रॉफ आणि साजिद नाडियादवाला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बागी 4 च्या पोस्टरचे अनावरण केले. ज्यामध्ये संजय दत्त उग्र लूकमध्ये दिसत आहे. खुर्चीवर एका मुलीचा मृतदेह धरून बसलेला, रक्ताने माखलेला संजय दत्त ओरडतोय, असे पोस्टरमधून दिसत आहे.

या पोस्टरच्या वर ‘प्रत्येक प्रियकर हा खलनायक असतो’ असे लिहिले आहे. या पोस्टर आणि कॅप्शनवरून असे दिसते की, प्रेम गमावल्यानंतर अभिनेता खलनायक बनतो. या चित्रपटात संजय दत्तच्या एन्ट्रीने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

साजिद नाडियादवाला निर्मित, बागी 4 चे दिग्दर्शन ए. हर्ष यांनी केले आहे. बागी फ्रँचायझीचा हा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. आतापर्यंत फक्त टायगर आणि संजयचे लूक समोर आले आहेत. हिरोईनबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.