यूपीमधील ग्रेटर नोएडाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक विद्यार्थ्याला मारहाण आणि शिवीगाळ करून पळवून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांचे अपहरण करताना कोणीतरी व्हिडिओ बनवला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. (हेही वाचा - Beed Minor Girl Rape Case: अल्पवयीन आरोपींकडून आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, बीड येथील धक्कादायक घटना)
याप्रकरणी ग्रेटर नोएडाचे एडीसीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी दिल्लीचे रहिवासी शंतनू आणि शिवम यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. मात्र, एडीसीपीने विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा इन्कार केला आहे.
पाहा पोस्ट -
ग्रेटर नोएडा : छात्रों के दो गुटों में मारपीट, अगवा करने का वीडियो वायरल#GreaterNoida pic.twitter.com/KAiQh3gGUU
— NDTV India (@ndtvindia) December 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)