Atal Bihari Vajpayee Death Anniversary 2019 (Photo Credits: Twitter/ ANI)

Atal Bihari Vajpayee 1st Death Anniversary: भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्यासह अमित शाह (Amit Shah) व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सदैव अटल (Sadaiv Atal) या दिल्ली येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांची मानस कन्या नमिता कौर भट्टाचार्य, नात निहारिका या देखील उपस्थित होत्या.

16ऑगस्ट 2018 ला अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. मागील अनेक वर्षांपासून अटल बिहारी वाजपेयी विविध व्याधींनी त्रस्त होते त्यामुळे त्यामुळे सक्रिय राजकारणापासून दुरावा घेतला होता. आज सदैव अटल या स्मृतिस्थळावर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर भाजपाने 100 नद्यांमध्ये अस्थि विसर्जन केले होते. हरिद्वारमधील गंगा नदीपासून या अस्थि विसर्जनाला सुरूवात करण्यात आली आहे. 2014 साली वाजपेयींचा देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्न या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.