
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले गौतम अदानी (Gautam Adani) आता परोपकाराच्या बाबतीत पुढे आहेत. गौतम अदानी हे आशियातील सर्वात मोठे दानवीर ठरले आहेत. फोर्ब्स आशियातील परोपकारी व्यक्तींची यादी (Asia Philanthropy List) मंगळवारी प्रसिद्ध झाली. या यादीच्या 16 व्या आवृत्तीत भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशिवाय शिव नाडर आणि अशोक सूता यांचीही नावे आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार हे तिघे आशियातील सर्वात मोठे दानशूर आहेत.
त्याचबरोबर मलेशियन-भारतीय उद्योगपती ब्रह्मल वासुदेवन आणि त्यांची पत्नी शांती कंडिया यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, या यादीमध्ये कोणत्याही रँकिंगशिवाय आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील आघाडीच्या दानशूर व्यक्तींचा समावेश आहे. अदानी यांनी या वर्षी जूनमध्ये त्यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त 60,000 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले होते.
ही रक्कम शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासावर खर्च करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी (23 जून 2023) अदानी यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. या ट्विटमध्ये ते शाळकरी मुलांसोबत दिसले होते. ट्वीटसोबत त्यांनी लिहिले होते, ‘माझ्या वडिलांच्या 100 व्या जयंती आणि माझ्या 60 व्या वाढदिवसानिमित्त, अदानी कुटुंबाने देशभरातील आरोग्य सेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी 60,000 कोटी रुपयांची देणगी देण्याचे वचन दिले आहे.’
On our father’s 100thbirth anniversary & my 60thbirthday, Adani Family is gratified to commit Rs 60,000 cr in charity towards healthcare, edu & skill-dev across India. Contribution to help build an equitable, future-ready India. @AdaniFoundation pic.twitter.com/7elayv3Cvk
— Gautam Adani (@gautam_adani) June 23, 2022
याच कारणामुळे त्यांचा आशियातील सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अदानी फाउंडेशनची स्थापना 1996 मध्ये झाली. दरवर्षी हे फाउंडेशन भारतातील 37 लाख लोकांना मदत करते. दुसरीकडे अब्जाधीश शिव नाडर यांनी शिव नादर फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी एका दशकात धर्मादाय कार्यात एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यावर्षी त्यांनी फाऊंडेशनला 11,600 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या फाउंडेशनची स्थापना 1994 मध्ये झाली. (हेही वाचा: UPI Transactions: देशातील अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात युपीआय व्यवहारांमध्ये तब्बल 650 टक्के वाढ- Reports)
त्याच वेळी, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अशोक सूता यांनी न्यूरोलॉजिकल रोगांच्या अभ्यासासाठी एप्रिल 2021 मध्ये स्थापन केलेल्या मेडिकल रिसर्च ट्रस्टला 600 कोटी रुपये देण्याचे वचन दिले होते. 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी SKAN- वृद्धत्व आणि न्यूरोलॉजिकल रोगांसाठी वैज्ञानिक संशोधन सुरू केले. मलेशियन-भारतीय ब्रह्मल वासुदेवन, क्वालालंपूरस्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रिएटरचे सीईओ आणि संस्थापक आणि त्यांची वकील पत्नी शांती कंडिया क्रिएटर फाउंडेशनच्या माध्यमातून मलेशिया आणि भारतीयांना मदत करतात.