तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun Arrested) यास चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'पुष्प 2' (Pushpa 2) चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान 4 डिसेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी (Hyderabad Stampede) पोलिसांनी ही कारवाई (Telugu Actor Arrest) केली आहे. या चेंगराचेंगरीत एका 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी संध्या थिएटर (Sandhya Theatre Incident) व्यवस्थापन, अभिनेता आणि त्याच्या बॉडीगार्ड्स विरोधात गुन्हा दाखल केला. चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये अल्लू अर्जुन (Allu Arjun News) आणि त्याच्या चमूच्या उपस्थितीबद्दल पोलिसांना आगाऊ माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे घडलेल्या घटनेस अभिनेत्यासह इतर लोक जबाबदार असल्याचा आरोप,असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अल्लू अर्जून याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप
'पुष्प 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान 4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीवरुन चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात अभिनेता अल्लू अर्जुन याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) मध्य क्षेत्र अक्षांश यादव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (सदोष मनुष्यवध) आणि कलम 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करून गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाट्यगृहातील गोंधळाच्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले ", असे यादव यांनी म्हटल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. (हेही वाचा, Pushpa 2 Box Office Collection Day 5: 'पुष्पा 2: द रुल'ची कमाई घटली, पहिल्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी)
अल्लू अर्जून पोलिसांच्या ताब्यात, त्याची टीम चौकशीच्या फेऱ्यात
सध्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून अल्लू अर्जुनला शुक्रवारी (13 डिसेंबर) ताब्यात घेण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात झालेल्या त्रुटीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अभिनेत्याचे सुरक्षा पथक आणि नाट्यगृह व्यवस्थापन देखील चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकले आहे. दरम्यान, या घटनेमुळे उच्चभ्रू मंडळीच्या कार्यक्रमांमधील गर्दीचे व्यवस्थापन आणि ख्यातनाम व्यक्ती आणि आयोजकांच्या जबाबदारीबद्दल व्यापक चर्चा सुरू झाली आहे. (हेही वाचा, Canteen Owner Bites Man's Ear Over Food Bill: पुष्पा 2 पाहिल्यानंतर कॅन्टीनच्या मालकाचं फिरलं डोक; बिलावरून झालेल्या भांडणात घेतला तरुणाच्या कानाला चावा)
'पुष्पा 2: द राइज' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. चित्रपटाने आधीच जगभरात ₹1000 कोटींची कमाई केली आहे. इतका मोठा टप्पा सर्वात जलद गाठणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, स्टार अल्लू अर्जुनचे स्टारडम देखील वाढले आहे, तसेच त्याच्या बँक बॅलन्समध्येही वाढ झाली आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेता या चित्रपटातून ₹300 कोटी कमवू शकतो.