IRCTC (PC - Facebook)

सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू आहे. अशात आयत्या वेळेस सुट्टी एंजॉय करण्यासाठी प्लॅन्स बनवणार्‍यांची संख्या अधिक असते. रेल्वेचं तिकीट 2 महिने आधीच बूक होत असल्याने अनेकांना आयत्या वेळेस तिकीट मिळत नाही. अशावेळेस अनेकांना तात्काळ बूकिंगचा (Tatkal Bookings) असतो पण आज (26  डिसेंबर) या ऐन सीझनच्या वेळेतच आयआरसीटीसी ची वेबसाईट (IRCTC Website), अ‍ॅप्स (App) क्रॅश झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तिकीट मिळू न शकल्याने अनेक प्रवासी युजर्सनी आपला संताप सोशल मीडीयात व्यक्त केला आहे.

10 दिवसात दुसर्‍यांदा IRCTC वेबसाईट क्रॅश

आयआरसीटीसी ची वेबसाईट दहा दिवसांत दुसर्‍यांदा क्रॅश झाली आहे. आजही डाऊनडिटेक्टर वर युजर्सनी वेबसाईट प्रतिसाद देत नसल्याची तक्रार केली आहे. यावर रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी 9 डिसेंबरला सुद्धा अशाचप्रकारे वेबसाईट क्रॅश झाल्याचा प्रकार समोर आला होता. Railway Online Ticket Booking Rules: दुसऱ्यांचं तिकीट काढला तर थेट तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल; Indian Railway चा नवा नियम माहित आहे का? 

प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

तात्काळ बुकिंगच्या वेळा

रेल्वे कडून दुसर्‍या दिवशी प्रवाशासाठी एक दिवस आधी तात्काळ बुकिंगची सोय आहे. यामध्ये सकाळी 11 वाजता नॉन एसी आणि सकाळी 10वाजता एसी कोचसाठी बुकिंग सुरू होते. मात्र आज अनेकांना या वेळेत तिकीट बुकिंग करता न आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.