Flights| Photo Credits: ANI

भारतामध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील 2 महिन्यांपासून ठप्प असलेली विमान सेवा आता हळूहळू सुरू केली जात आहे. यामध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून मर्यादीत स्वरूपामध्ये 25 मे पासून विमान सेवा सुरू केली त्यामुळे काही शहरांमध्ये प्रवाशांना विमानप्रवास करण्याची मुभा आहे. मात्र हा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा याकरिता सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी DGCA कडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

विमान प्रवासादरम्यान आता सोशल डिस्टन्सिंग पाळता यावे याकरिता विमान कंपन्यांनी मधल्या सीटस रिकाम्या ठेवाव्यात असे आदेश दिले आहेत. मात्र प्रवासी संख्या पाहता तसं करणं शक्य नसेल तर प्रवाशांच्या सोयी आणि सुरक्षेसाठी सार्‍या प्रवाशांना सुरक्षा कीट द्यावेत. ज्यामध्ये तीन लेयर सर्जिकल मास्क, फेस शील्ड आणि पुरेसे हॅन्ड सॅनिटायाझर असेल.

डीजीसीए ची माहिती

भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे 25 मे पासून ठप्प पडलेली देशांर्गत प्रवासी विमान सेवा आता सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. रस्ते, आणि रेल्वे मार्गे देखील प्रवास करण्याची मुभा आहे.