दिलासादायक! तब्बल दोन महिन्यांनंतर भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत झाली सर्वाधिक घट
coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases in India: भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ही खूपच भयानक असून या लाटेमध्ये कोरोना रुग्णांच्या मृतांच्या संख्येत लाक्षणिक वाढ झाली आहे. भारत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात मागील 24 तासांत 1 लाख 14 हजार 460 नवे कोरोना रुग्ण (New COVID Cases in India) आढळले असून 2677 जणांचा मृत्यू (New COVID Death Cases) झाला आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 88 लाख 9 हजार 339 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 लाख 46 हजार 759 कोरोनाचे बळी गेले आहेत. देशात सद्य घडीला 14 लाख 77 हजार 799 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 1 लाख 89 हजार 232 कोरोना रुग्ण बरे होऊन (New COVID Recovered Cases) त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 2 कोटी 69 लाख 84 हजार 781 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.हेदेखील वाचा- Coronavirus New Variant: भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट, 7 दिवसातच होते शरीरातील वजन कमी

देशात आतापर्यंत 23,13,22,417 नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. या कोरोनावर मात देत असता भारतात कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आढळला आहे. यामध्ये व्यक्तीचे वजन अवघ्या 7 दिवसात कमी होते. यापूर्वी हा व्हेरियंट ब्राझील येथे आढळून आला होता. मात्र आता भारतात सध्या अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले आहे.