लुधियाना :  10 तरूणांनी मुलीला कार मधून खेचून बाहेर काढले, अज्ञात स्थळी नेऊन बलात्काराचा प्रयत्न
Image used for representational purpose | File Photo

मित्रासोबत जाणार्‍या 21 वर्षीय तरूणीसोबत पंजाब, लुधियाना (Ludhiana) जवळील इसावल गावाजवळ एक गैरप्रकार घडला आहे. दहा लोकांच्या एका टवाळ समुहाने या तरूणीला गाडीतून खेचून बाहेर काढले आणि तिच्यावर गॅंगरेप ( Gang Rape)  केल्याचा दावा करण्यात आला आहे. सोमवारी पोलिसांनी या घटनेबद्दल मीडियाला माहिती दिली आहे. या प्रकारणाचा तपास करणारे तरूण रतन यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तीन मोटार सायकलवरून जाणार्‍या रोडरोमियोंनी कारचा पाठलाग केला. जशी कार थांबली तसा त्यांनी हल्ला केला.

टवाळ समुहाने त्या मुलीला बाहेर खेचले. काही लोकांना बोलावून त्या मुलीची छेड काढली आणि त्यानंतर सुनसान जागेचा फायदा घेत त्यांनी मुलीवर गॅंगरेपचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर रविवारपर्यंत तरूणीला बंधक बनवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. यानंतर तिच्यासोबत घडलेल्या दुष्कृत्याचा पर्दाफाश होईल. तरूणीसोबत गैर प्रकार करणार्‍यांचा पोलिस तपास सुरू आहे. या प्रकरणाबद्दल पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.