धक्कादायक! उत्तर प्रदेशातील एकाच कुटूंबातील 6 जणांनी मेथी समजून खाल्ली 'गांजाची भाजी'; तातडीने केले रुग्णालयात दाखल
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

उत्तर प्रदेशातील कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जो ऐकून तुम्हाला धक्का बसण्याऐवजी डोक्यावर हात माराल. झालं असे की, उत्तर प्रदेशातील (UP) कन्नौज जिल्ह्यातील एकाच कुटूंबातील 6 जणांनी मेथीची भाजी समजून गांजाची भाजी करुन खाल्ली. या घटनेची माहिती मिळताच या सहाही जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने या परिसरात खळबळ उडाली असून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या कुटूंबाने मेथीची भाजी समजून गांजा खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला व ते बेशुद्ध पडले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी तात्काळा त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कळले की , त्यांनी मेथीची भाजी समजून गांजा खाल्ला आहे. याप्रकणी एकाला अटक करण्यात आली आहे. 6 Members of Family in Kannauj District Eat ‘Ganja Sabzi' Thinking It's Methi, Hospitalised

मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका तरुणानं मजेमध्ये मेथीची भाजी आहे असं सांगून गांजा दिला होता. कन्नौज सदर कोतवाली भागातील मियागंज गावात नवल किशोर नावाच्या व्यक्तीने या कुटूंबातील ओमप्रकाश यांचा मुलगा नितेशला कोरडी मेथीची भाजी असल्याचं सांगून एक पिशवी दिली. त्यानंही कोरडी मेथीची भाजी आहे असं समजून भाजी बनवली आणि खाल्ली. संध्याकाळी मात्र या संपूर्ण कुटूंबाची तब्येत बिघडली.

पोलिसांनी भाजीचे सॅपल्स ताब्यात घेतले आहेत. भाजी म्हणून गांजा विकणाऱ्या नवल किशोर नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अधिक तपास करत आहेत.