येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल; 6 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Ashwjeet Jagtap
|
Mar 06, 2020 11:17 PM IST
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा देण्याचे प्रयत्न होऊ शकतात. या युवकांना बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सायन उड्डाणपूलाचे बेअरिंग बदलण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हे काम दोन महिने चालणार असून कामादरम्यान काही ब्लॉक्स घेण्यात येतात. त्यावेळेस उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद ठेवला जातो. आज सकाळी 6 वाजल्यापासून तिसरा ब्लॉक सुरु झाला असल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. हा ब्लॉक 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यादरम्यान प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागू शकते.
सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना आठ आठवड्यात उत्तर देण्यास बजावले आहे. मोहनीश जबलपुरे यांनी फडणवीसांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन, त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
चीनसह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात दिल्ली आणि तेलंगणामध्ये कोराना व्हायरसचे 2 संशयित आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.