अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह आणखी दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; 4 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Nov 04, 2020 11:42 PM IST
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका पार पडल्या असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी दरम्यान व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी टेक्सास, जॉर्जिया, फ्लोरिडा, न्यू हॅम्पशायर आणि वर्मोंट याठिकाणी आपली जागा पक्की केली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे साऊथ डकोटा आणि नॉर्थ डकोटा येथे विजयी झाले आहेत. दरम्यान, व्हाईट हाऊसजवळ लोकांची मोठी गर्दी असून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निकालाकडे संपूर्ण अमेरिकन नागरिकांसोबतच जगाचे लक्ष लागले आहे.
राफेलची दुसरा ताफा आज भारतात दाखल होईल. यात तीन राफेल विमानं फ्रान्समधून थेट भारतात पोहचतील. यासोबत मिड एअर रिफ्युइलींग विमानही असणार आहे. 28 जुलै रोजी 5 राफेल विमानं भारतात दाखल झाली होती आणि 10 सप्टेंबर रोजी ही विमाने अधिकृतपणे अंबाला येथे भारतीय हवाई दलात दाखल झाली.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचे संकट कायम असले तरी गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र दिसू लागले आहे. भारतात गेल्या 7 आठवड्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज पडणाऱ्या भरीची संख्या कमी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू नये यासाठी येणाऱ्या सणसुदीच्या काळात विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.