Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

झारखंडमध्ये आज 63 नवे कोरोना रुग्ण ; 3 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | Jul 03, 2020 11:42 PM IST
A+
A-
03 Jul, 23:42 (IST)

झारखंडमध्ये आज 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,697 वर पोहचली आहे.

03 Jul, 23:23 (IST)

तेलंगणामध्ये आज 1892 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

03 Jul, 22:44 (IST)

भारतीय हवामान विभागाने मुंबईत येत्या 48 तासात मुळसधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

 

03 Jul, 22:23 (IST)

कल्याण डोंबिवली मध्ये आज कोरोनाचे 564 नवे रुग्ण आढळले आहेत. यानुसार या केडीएमसी क्षेत्रातील ऍक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 4704 वर पोहचली आहे. आजवर 130 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

03 Jul, 22:01 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 807 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात नायडू-महापालिका रुग्णालये 435 , खासगी 361 आणि ससूनमधील 11 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 807 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता 19 हजार 849 इतकी झाली आहे. यापैकी 389 रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. 

03 Jul, 21:21 (IST)

मुंबईत आज 1372 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 81,634 इतकी झाली आहे.

 

03 Jul, 21:14 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आसाममधील पुरामुळे पीडित झालेल्यांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

03 Jul, 20:43 (IST)

गोव्यात आणखी 94 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1576 वर पोहचला आहे.

03 Jul, 20:33 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाच्या आणखी 6364 रुग्णांची भर पडली असून 198 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 1,92,990 वर पोहचला आहे.

03 Jul, 20:16 (IST)

जम्मू-कश्मीर येथे आणखी 170 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 8019 वर पोहचला आहे.

Load More

बॉलिवूड नृत्य दिग्दर्शिका सरोज खान (Saroj Khan)यांचे निधन झाले आहे. बांद्राच्या गुरुनानक रुग्णालयात (Gurunanak Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात जूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. काल राज्यात 6000 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करत लोकांना घरीच सुरक्षित राहण्यासाठी सांगितले जात आहे. दरम्यान त्यासाठी मुंबई पोलिस, प्रशासन कठोर कारवाई करत आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारत देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना सीमेवर देखील तणाव आहे. आज सुरक्षा सेना प्रमुख जनरल बिपिन रावत लेहच्या दौर्‍यावर जाणार आहे. त्यांना 14 कॉर्प्स द्अधिकार्‍यांकडून पूर्व लद्दाख प्रांतामधील सद्य स्थितीची माहिती सिली जाणार आहे.


Show Full Article Share Now