सोलापूर जिल्हा शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना Global Teacher Award जाहीर झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले अभिनंदन ; 3 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Dec 03, 2020 11:44 PM IST
विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतचं आहे. अमरावती, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मराठवाडा मध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधील ही निवडणूक आहेत. आज उशिरा पर्यंत हा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूकीचा निकाल हाती लागणार आहे.
दरम्यान दक्षिण भारतामध्ये आता बुरेवी चक्रीवादळ धडकणार आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये या चक्रीवादळाचा धोका अधिकआहे. काल बुरेवी चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पुढे सरकले. 3 डिसेंबरला मुन्नारकडे तर 4 डिसेंबरला कन्याकुमारी ते तमिळनाडूच्या दिशेने सरकण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये सध्या शेतकर्यांचा मुद्दा देखील संघर्षाचा झाला आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर केंद्र सरकराच्या कृषी कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्यांना आता राजस्थानातील शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. आज पुन्हा केंद्रीय कृषीमंत्र्यांना शेतकरी भेटणार आहेत. खेळाडू पाठोपाठ साहित्यिकांनी देखील किसान आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.