आंध्र प्रदेश येथे आणखी एक रुग्ण आढळला; राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 11 वर पोहचली; 26 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Mar 27, 2020 12:06 AM IST
कोरोना व्हायरसच्या देशावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. यावरही नियंत्रण मिळवण्याचे पोलिस सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर गर्दी टाळण्याचं आवाहनही केलं जात आहे.
भारतात 600 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असून महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे 117 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांना देखील कोरोनाच्या संकटाची गंभीरता लक्षात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध या जीवानश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासह बँका देखील खुल्या राहणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तसंच कोरोना व्हायरस संबंधित माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने 9013151515 हा व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. यावरील सेवा 24 तास सुरु राहणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. लॉकडाऊनच्या काळात काही अडचण आल्यास +91 2026127394 या व्हॉटस्अॅप चॅटबॉटवर प्रश्न विचारुन तुमच्या शंकेचे निरसन करु शकता.