Live
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह; 22 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Apr 22, 2020 10:52 PM IST
भारतासह जगभरात कोरोना वायरसचा धोका वाढत आहे. भारतामध्ये सध्या 15 हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 3869 जणांवर उपचार झाले असून 640 जणांचा कोरोनाने बळी घेतले आहेत. भारतामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 19,984 वर पोहचला आहे. महाराष्ट्रामध्येही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान जगभरात सध्या अमेरिकामध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळत आहेत. दरम्यान AFP news agency च्या माहितीनुसार काल 24 तासामध्ये 2700 कोरोनाचे बळी गेले आहे. अमेरिकेत दिवसागणिक वाढणारा हा आकडा नागरिकांना अस्वस्थ करणारा आहे.
एकीकडे जागतिक आरोग्य संकटाशी सामना करताना आर्थिक चक्र सांभाळण्याचंही आव्हान आहे. यामध्ये आज करण्यात आलेल्या घोषणेनुसार, फेसबूकने रिलायंस जिओमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान फेसबूक यामध्ये सुमारे 5.7 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान रॅपिड टेस्टिंग कीट सदोष असल्याच्या भीतीमुळे राजस्थानात मोठ्या केल्या जाणार्या टेस्ट थांबवण्यात आल्या आहे. दरम्यान दोन प्रकारे केल्या जाणार्या टेस्टमध्ये मोठा फरक आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.