निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झालेले राजीव कुमार 1 सप्टेंबर रोजी पदाचा कार्यभार स्वीकारतील; 21 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
Aug 21, 2020 11:36 PM IST
मुंबईत (Mumbai) आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. भांडूप (Bhandup), सायन (Sion), माटुंगा (Matunga) येथे सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला असून अंधेरी, सांताक्रूज येथे जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा तानसा तलाव (Tansa Dam) काल संध्याकाळी 7.05 मिनिटांनी ओव्हरफ्लो झाला. यामुळे ही बातमी मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे अशीच म्हणावी लागेल. यामुळे मुंबईकरांसमोर उभे असलेले पाणीटंचाईचे संकट काहीसे कमी होईल असे म्हणण्यास हरकत नाही.
तर दुसरीकडे दर दिवसा भारतात 9 लाखांहून अधिक कोविड-19 (COVID-19) च्या चाचण्या वाढल्या असल्याचे WHO संस्थेने म्हटले आहे. गेल्या 24 तासांत 9 लाख 18 हजार 470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 28,36,926 वर पोहचली असून त्यापैकी 6,86,395 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 20,96,665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर पोहोचली असून 21,359 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सद्य घडीला राज्यात 1,62,491 रुग्णांवर उपचार सुरु आहे.