Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 06, 2025
ताज्या बातम्या
27 seconds ago

रस्त्याने पायी चालत निघालेल्या 1 लाख 65 हजार 890 परप्रांतीयांना राज्यांच्या सीमांपर्यंत नेऊन सोडले- जलसंपदा मंत्री जयंत पाटील; 20 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Dipali Nevarekar | May 20, 2020 11:34 PM IST
A+
A-
20 May, 23:34 (IST)

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याने पायी चालत आपल्या राज्यात निघालेल्या 1 लाख 65 हजार 890 परप्रांतीयांना एसटी महामंडळाच्या,13 हजार 655 बसेसद्वारे त्यांच्या राज्यांच्या सीमांपर्यंत नेऊन सोडले. तसेच परवानगी घेऊन खाजगी 2 लाख वाहनांद्वारे 8 लाख लोक राज्याच्या सीमेबाहेर गेले. 

20 May, 22:52 (IST)

भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे 200 प्रवासी रेल्वे सेवांचे काम सुरू करेल. या गाड्या 1 जूनपासून सुरू होतील आणि या सर्व गाड्यांचे बुकिंग 21 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल.

20 May, 21:56 (IST)

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 14 मृत्यू आणि 174 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण मृतांचा आकडा आता 235 वर पोहोचला आहे,  तर एकूण सकारात्मक प्रकरणे 4,544 झाली आहेत.

20 May, 21:30 (IST)

बिबेक वासमे उप-विभागीय अधिकारी (SDO) बशीरहाट, यांच्या संध्याकाळी 7 वाजताच्या वृत्तानुसार, Cyclone Amphan मुळे पश्चिम बंगालमधील उत्तर परगणामध्ये 5500 घरांचे नुकसान, 2 जणांचा मृत्यू आणि 2 गंभीर जखमी झाले आहेत.

20 May, 21:05 (IST)

मुंबईत आज आणखी 1372 कोरोना रुग्ण आणि 41 मृत्यूची नोंद आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता 23, 935 झाली आहे, ज्यात  841  मृत्यूंचा समावेश आहे याबाबत बीएमसी तर्फे माहिती देण्यात आली आहे.

20 May, 21:00 (IST)

मुंबईत 2 महिन्यांपासून 3000 खासगी रुग्णवाहिका 'गायब' आहेत. मी 5 एप्रिल रोजी हा मुद्दा उपस्थित केला होता. ठाकरे सरकार यांनी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत या रुग्णवाहिकांच्या मालकांवर कोणतीही कारवाई केली नाही. का? हे मालक सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत का असा सवाल करत कंभाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.

20 May, 20:35 (IST)

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाव्व्हायरस रुग्णांची संख्या  39, 297 इतकी झाली आहे.  आज महाराष्ट्रात 2250 नवीन कोविड 19 प्रकरणे आणि 65 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी एकूण सक्रिय रूग्ण 27581 आहेत तर 1390 जणांचा मृत्यू झाला आहे.

20 May, 20:14 (IST)

भारतात कोरोना व्हायरस च्या एकूण 1 लाख रुग्णांमध्ये केवळ 0.2 टक्के मृत्युदर असल्याची माहिती मिळत आहे.

20 May, 19:54 (IST)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज विशेष बैठक घेतली होती. यंदाच्या परीक्षांच्या तारखा या पुढील ५ जून रोजी होणाऱ्या बैठकीत  या बैठकीत सांगण्यात आले आहे.परीक्षांचे सुधारित वेळापत्रक या बैठकीनंतर अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

20 May, 19:35 (IST)

बुलडाणा मध्ये  मागील 28 दिवसांत एकही कोविडचा रूग्ण आढळून न आल्याने जिल्ह्यातील सात भाग हे कंटेनमेंट झोन मधून वगळण्यात आले आहेत. यामध्ये जुना गांव बुलडाणा, हकीम कॉलनी दे राजा, चितोडा ता. खामगांव, इदगाह प्लॉट शेगांव, कुरेशी गल्ली सिं राजा, तहसिल कार्यालय परीसर मलकापूर आणि आंबेडकर नगर दे.राजा  या भागांचा समावेश आहे. 

 

Load More

46भारताच्या पूर्व किनारपट्टीला असणार्‍या बंगालच्या उपसागरामध्ये आज अम्फान चक्रीवादळ धडकणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास पश्चिम बंगाल, बांग्लादेशजवळ हे वादळ धडकेल असा अंदाज आहे. दरम्यान सध्या हवेचा वेग 155 ते 165 किमी प्रति तास आहे. त्यामध्ये वाढ होऊन तो 180 किमी देखील होत असल्याचं पहायला मिळालं आहे. यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. तेथे मदतीसाठी सुमारे 41 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत.

1 जून पासून रोज 200 नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या रेल्वेच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना गावी जाता येणं शक्य होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती काल रात्री उशिरा केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. काल 24 तासामध्ये अमेरिकेमध्ये 1500 बळी गेले आहेत. तर भारतामध्येही कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखाच्या पार गेला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने आता नागरिकांना अधिक दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Show Full Article Share Now