Representational Image (Photo Credits: Twitter/U4U_Voice)

1984 Anti-Sikh Riots: 1984 च्या शीख दंगलीचा आज ३४ वर्षांनी निकाल लागला आहे. पाटियाला हायकोर्टाने दिलेल्या निकालामध्ये यशपाल सि‍ंह (Yashpal Singh) यांना फाशीची तर नरेश सहरावत (Naresh Sherawat) यांना जन्मठेप ठोठावण्याचा निर्णय देण्यात आला आहे. 1 नोव्हेंबर 1984 साली  दक्षिण दिल्लीच्या महिपालपुर भागात हरदेव सिंह आणि अवतार सिंह यांची हत्या करण्यात आली होती.

सरकारी वकील आणि पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र बचावपक्षाकडून दयेची विनंती करण्यात आली. वय आणि आजारपण पाहता शिक्षा कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्राच्या आदेशानंतर नेमलेल्या एका विशेष तपास पथकाने (SIT) अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर दोषींचा गुन्हा गंभीर असल्याचे सांगत कट रचून हे कृत्य केल्याचे सांगितले होते. तसेच याप्रकरणी आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.

कोर्टाने दोषींवर 302 (हत्या),307 (हत्येचा प्रयत्न) यांच्यासोबतच 395, 324 ( हत्यारं बाळगणं ) अशा गंभीर कलामांर्तगत आरोपी ठरवले आहे.