Petrol Diesel Rates Today: पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel) किंमतीत आज सलग दहाव्या दिवशी वाढ झाली आहे. आज पेट्रोलच्या किमतीत 47 पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलचे दर सुद्धा 93 पैशाने वाढले आहेत. एकूण दहा दिवसात या इंधनाच्या किमतीत झालेली वाढ पाहता पेट्रोलचे भाव एकूण 5.47 रुपयांनी वाढले आहेत तर डिझेल मध्ये सुद्धा 5.8 रुपयांची वाढ झाली आहे. आजच्या नव्या दरानुसार, पेट्रोलसाठी मुंबई मध्ये 47 पैशांची तर दिल्ली मध्ये 45 पैशांची वाढ झाली असून यानुसार आज मुंबईत प्रति लिटर पेट्रोल साठी 83.62 रुपये तर दिल्लीत 76.73 रुपये इतके दर आहेत. दुसरीकडे डिझेल च्या किमतीत सुद्धा मुंबई मध्ये 54 पैसे तर दिल्ली मध्ये 57 पैसे वाढ होऊन आज प्रति लिटर डिझेल साठी अनुक्रमे 73.75 व 75.19 रुपये इतके दर आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
पेट्रोल डिझेलच्या किमतीत आजच्या वाढीनुसार मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू सहित मुख्य शहरातील प्रति लिटर मागील दर जाणून घेण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा.
पेट्रोल आणि डिझेल चे मुख्य शहरातील दर
शहर | पेट्रोल चे दर | डिझेल चे दर |
मुंबई | 83.62 | 73.75 |
दिल्ली | 76.73 | 75.19 |
चेन्नई | 80.41 | 73.21 |
कोलकाता | 78.55 | 70.84 |
हैदराबाद | 79.65 | 73.49 |
चंदिगढ | 73.86 | 67.21 |
जयपुर | 84.09 | 76.48 |
पाटणा | 80.53 | 73.36 |
बंगळुरु | 79.22 | 71.49 |
दरम्यान, 7 जून पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 16 मार्च रोजी वाढ झाली होती. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे तब्बल 3 महिने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फार मोठे बदल झाले नव्हते.