जम्मू-कश्मीर येथे 2G सर्विस येत्या 27 एप्रिल पर्यंत पोस्टपेड आणि वेरिफायईड प्रिपेड सिमकार्डसाठी सुरु राहणार ; 15 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Apr 15, 2020 11:54 PM IST
लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा. त्यामुळे देशभरात उमटलेल्या संमिश्र प्रतिक्रिया आणि प्रश्न यामुळे कालचा दिवस चर्चेत राहिला. त्यात मुंबई येथील वांद्रे स्टेशनवर उसळलेल्या परप्रांतीय नागरिकांच्या गर्दीने तर कहरच केला. या सर्व प्रकारावर राजकीय टीका टीप्पणी सुरु झाली. या सर्व गदारोळात आजचा दिवस सुरु झाला आहे. त्यामुळे सहाजिकच कालच्या वांद्रे प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणास कारणीभूत असल्याचा संशय असलेल्या विनय दुबे नामक एका उत्तर भारतीय नेत्याला पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र, तेवड्यावर हे प्रकरण न थांबाता पुढे अधिक तापण्याची आणि राजकीय वर्तुळातून तापवले जाण्याची शक्यता आहे. यावर आज दिवसभर लक्ष राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. काल दिवशभरात रात्री उशिरा हाती अलेल्या शेवटच्या अपडेटनुसार राज्यात 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला एकूण देशाचा विचार करता कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 10815 इतकी आहे. त्यापैकी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9272 आहे. तर उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्तिंची संख्या 1189 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 353 इतकी आहे.
दरम्यान, आज दिवसभरात महाराष्ट्र, देश आणि विदेशात कोरोनाबाबतीत काय घडामोडी घडतात. कोरोना रुग्णांची संख्या कमी होते की वाढते यासह इतरही विविध जसे की क्रीडा, आरोग्य, राजकारण, समाजकारण,अर्थकारण, पर्यावरण आदी विषयांवरही लेटेस्टली मराठी लक्ष ठेऊन असणार आहे. त्यामुळे दिवसभरातील ताज्या, ठळक घटना आणि घडामोडींचे अपडेट मिळविण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.