जगभरातील 124 देशातील गायकांच्या  आवाजात पुन्हा निनादले 'वैष्णव जण तो.. ' चे सूर
गांधी जयंतीPhoto Credits: Wikimedia Commons

महात्मा गांधींजींचं आवडतं भजन 'वैष्णव जण तो' पुन्हा नव्या स्वरूपात रसिकांसमोर आलं आहे. जगभरातील विविध सामान्य लोकांच्या आवाजात हे भजन पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलं आहे. जगभरातील सुमारे १२४ देशातील गायकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमातील हे विशेष आकर्षण ठरलं आहे. आज नरेंद्र मोदींनीही हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 150 व्या गांधी जयंती निमित्त ट्विटरची खास इमोजी

१५ व्या दशकात गुजराती कवी नरसिंह मेहता यांनी वैष्णव जण तो हे भजन लिहले. हे भजन महात्मा गांधींजींच्या आवडीचे होते. नियमित त्यांच्या कामाची सुरुवात होण्यापूर्वी वैष्णव जण तो हे भजन होत असे. दिवासाच्या सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये या भजनाचा समावेश केला जात असे.

 

नव्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या भजनामध्ये मालदिव्स ,पाकिस्तान , श्रीलंका पासून अगदी आइसलँड पर्यंतच्या स्थानिक कलाकारांनी हे . भजन त्यांच्या अंदाजात गायलं आहे. All Indian missions abroad ने जगभरातील १२४ देशातील विविध कलाकारांकडून हे भजन गाऊन घेतलं त्यानंतर आज ते एका व्हिडिओच्या स्व रूपात प्रसिद्ध करण्यात आलं आहे.